प्रवेशद्वारासमोरील खड्डय़ातील मातीमुळे दलदल
प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारातच चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे प्रवाशांना चिखलातूनच वाट काढावी लागत आहे. रात्रीच्यावेळी या चिखलामध्ये अडकून बरेच प्रवासी पडत आहेत. त्यामुळे ही समस्या दूर करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.
बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण केले जात आहे. त्यामुळे सध्या असणाऱया प्रवेशद्वाराच्या शेजारी एक भला मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. त्या खड्डय़ातील माती प्रवेशद्वारालगत टाकण्यात आली आहे. मागील चार दिवसांत झालेल्या पावसामुळे या परिसरात दलदल तयार झाली आहे. या चिखलातूनच प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे. ज्यांच्याकडे दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. त्यांना त्रास होत नसला तरी जे प्रवासी प्रवेशद्वारापासून तिकीट काऊंटरपर्यंत चालत जात आहेत, त्यांची गैरसोय होत आहे.
बरेच प्रवासी बसने रेल्वेस्थानक परिसरात येतात. त्यांच्याकडे बरेच साहित्य असते. अशा प्रवाशांचे तर पुरते हाल होत आहेत. प्रवाशांना साहित्य घेऊन सांभाळत चिखलातून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे रेल्वेच्या वरि÷ अधिकाऱयांनी या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.