बेळगाव / प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून रेल्वेस्टेशन समोरील रस्त्यावर बस्तान बसविलेल्या लोकांनी परिसर गलिच्छ केल्यामुळे त्यांना हुसकविण्यात आले. या लोकांनी आता रेल्वे उड्डाणपूलानजिकच्या फूटपाथवर आपले बस्तान बसविले आहे. यामुळे वाहने चालविताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
गोगटे सर्कंल परीसरात सिग्नलवर विविध साहित्य विक्री करण्याचे काम हे लोक करतात. त्यासोबत बाजारपेठमध्ये भिक मागण्याचे काम या व्यक्ती करतात. मागील काही दिवसांपासून हे लोक रेल्वेस्टेशन परिसरात ते राहत आहेत. त्याचठिकाणी आंघोळ, उरलेले अन्न टाकण्यात येत असल्यामुळे या परिसर गलिच्छ झाला आहे. तसेच परिसरात दुर्गंधी पसरली होती. रेल्वेस्टेशन, हेस्कॉम कार्यालय व गोवा बसस्थानक परिसरात येणाऱयांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता.
त्यांना त्या ठिकाणहून हुसकावल्यानंतर त्यांना जवळच असणाऱया बसवेश्वर उड्डाणपूलावर आपले बस्तान बसविले आहे. परंतु त्या ठिकाणी जास्त जागा उपलब्ध नसल्याने अपघाताला कारण ठरत आहे. त्यामुळे मोठा अपघात घडण्यापूर्वी त्या ठिकाणहून त्यांना इतरत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.