ओळख पटविण्यासाठी कॅम्प पोलिसांचे प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वे स्टेशनजवळील बसस्थानकानजीक एका कट्टय़ावर दोन दिवसांपूर्वी अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. कॅम्प पोलिसांनी सुमारे 60 ते 65 वषीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
गेल्या आठवडाभरापासून हा अनोळखी वृद्ध रेल्वे स्टेशन बसस्थानक परिसरात फिरत होता. 25 जानेवारी रोजी दुपारी त्याचा मृतदेह आढळून आला असून कॅम्प पोलीस स्थानकात बुधवारी यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 5 फूट 4 इंच उंची, काळसर वर्ण, अंगाने सडपातळ असे त्याचे वर्णन आहे.
या वृद्धाने आपल्या अंगावर राखाडी शर्ट व निळी नाईट पँट परिधान केली आहे. या वृद्धाची ओळख पटविण्यासाठी 0831-2405234 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.