मास्क लावून ऑर्डर दिल्यास दंड
मागील काही महिन्यांमध्ये कोरोना महामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आता सामान्य बाब ठरली आहे. प्रशासनासह दिग्गज कलाकार सर्वांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याचे आवाहन करत आहेत. पण अमेरिकेत एक रेस्टॉरंट असे आहे जे मास्क घातलेल्या लोकांवर दंड ठोठावत आहे.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरात फिडलहेड्स कॅफे असून जो स्वतःच्या नियमांमुळे चर्चेत आहे. या कॅफेचे मालक क्रिस कासलमॅन आहेत. ते नेहमीच कोरोनामुळे लागू दिशानिर्देशांचे विरोधक राहिले आहेत. तसेच कोरोनावरील लसीचे ते समर्थक नाहीत. लॉकडाउनमुळे अमेरिकेला मोठे नुकसान झेलावे लागल्याचे ते मानतात.
अमेरिकेत कॅलिफोर्निया आणि हवाई प्रांतांमध्ये लस घेतल्यावरही लोकांना इनडोअर्समध्येही मास्क वापरावा लागतो. पण तरीही क्रिस स्वतःच्या रेस्टॉरंटमध्ये लोकांना मास्कमध्ये पाहू इच्छित नाहीत. त्यांचा रेस्टॉरंटच्या पहिल्या नियमानुसार जर कुणी मास्कमध्ये दिसला तर त्याला 5 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात येतो.
जर कुणी लसीचे कौतुक करताना आढळल्यास त्याच्यावरही 5 डॉलर्सचा दंड ठोठावण्याचा नियम या रेस्टॉरंटने केला आहे. दंडाची सर्व रक्कम स्थानिक चॅरिटीला दिली जाणार असल्याचे क्रिस यांनी म्हटले आहे.
नियमांचे फलक रेस्टॉरंटबाहेर लावल्यापासून अनेक लोक तो वाचून परत जातात. तर दंडाची रक्कम सामाजिक सेवेसाठी वापरली जात असल्याचे कळताच रेस्टॉरंटमध्ये येण्याचा निर्णय घेतात अशी माहिती त्यांनी दिली आहे.
नैराश्य, गरीबी आणि अन्य कारणांमुळे अमेरिकेत आत्महत्या करणाऱयांची संख्या मागील अनेक वर्षांमध्ये वाढली आहे. मास्कविरोधी होत मी स्वतःच्या पद्धतीने या गोष्टींना सामोरा जाऊ इच्छितो. माझी पद्धत उर्वरितांपेक्षा वेगळी असेल पण यामुळे मी गुन्हेगार ठरत नसल्याचे विधान क्रिस यांनी केले आहे.