बागणी / वार्ताहर
वाळवा तालुक्यातील रोझावाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या शेत वस्तीवर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरलेल्या उसाची ट्रॉली जनावरांच्या शेडवर उलटली यामध्ये दोन जनावरे दगावली. वैभव कारंडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर ऊस भरून शेतातून मेन रस्त्याला येत असताना वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे विकास पाटील व रमेश पाटील यांच्या शेड वरती कोसळला यामध्ये एक गाई व एक म्हैस मृत्युमुखी पडले. अंदाजे ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले आहे. व पत्र्याचे शेड देखील कोसळले आहे त्याचे २० ते ३० हजाराचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. सायंकाळी उशिरा या जनावरांना बाहेर काढून पुरण्यात आले.