शिवलिंग पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी : जमखंडीत रोटरी, इनरव्हीलचा पद्ग्रहण समारंभ
वार्ताहर / जमखंडी
रोटरी ही निःस्वार्थ सेवा करणारी संस्था असून पदाधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली संघटितपणे प्रशंसनीय कार्य होत असल्याचे प्रतिपादन मुत्तीनकंती मठाचे शिवलिंग पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजींनी केले. येथील रोटरी व इनरव्हील संस्थेच्या पद्ग्रहण समारंभात बोलत होते.
रोटरी ही आंतरराष्ट्रीय संस्था असून जमखंडीत 60 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या संस्थेने कोरोना संकटात केलेली सेवा कौतुकास्पद असल्याचे गोकाक रोटेरियन सोमशेखर मगदूम यांनी सांगितले. संस्थेला 20 गुंठे जागा दान दिलेल्या धनराज मोरे यांचा सत्कार करण्यात आला. या जागेत संस्थेचे भवन सदस्यांच्या सहकार्यातून उभारण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
सोमशेखर मगदूम यांच्या हस्ते रोटरी पदाधिकाऱयांना अधिकाराची सूत्रे देण्यात आली. अध्यक्ष योगाप्पा सवदी, कार्यदर्शी बसवराज बळगार, कोषाध्यक्ष बसवराज आलगूर, उपाध्यक्ष राजशेखर कोवळ्ळी, राजेंद्र बिरादार यांनी पद्भार स्वीकारला. इनरव्हील पदाधिकाऱयांना विद्या मगदूम यांच्या हस्ते अधिकार देण्यात आला. अध्यक्षा हर्षा प्रभू, सचिव अर्चना काखंडकी, कोषाध्यक्षा शिला मुरगोड, उपाध्यक्षा डॉ. अश्विनी पुजारी यांनी पद्भार स्वीकारला.
मावळते अध्यक्ष, डॉ. ए. आर. देवरेड्डी यांनी स्वागत केले. अहवाल वाचन श्रीधर काखंडकी व महानंदा डूगनवर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय चन्नाप्पा बिरादार व एस. वाय. बिरादार यांनी करून दिला. सूत्रसंचालन आर. पी. न्यामगौड व डॉ. माळेश पुजारी यांनी तर बसवराज बळगाव यांनी आभार मानले.