प्रतिनिधी /बेळगाव
रोट्रक्ट क्लब ऑफ बेळगाव नॉर्थचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच हॉटेल यू के 27 येथे झाला. यावेळी उप प्रांतपाल प्रकाश मिर्जी यांच्या हस्ते अध्यक्ष रोटे. मारिया सावर, सचिव नयना नेर्ली व खजिनदार सौरव देसुरकर यांना अधिकार सूत्रे देण्यात आली.
या नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्ष अर्णव आजगावकर, क्लब सर्व्हिस डायरेक्टर इशान कलघटगी, कम्युनिटी सर्व्हीस डायरेक्टर इक्राम सिद्दीकी, प्रोफेशनल सर्व्हीस डायरेक्टर चिन्मय गुंडलूर, इंटरनॅशनल सर्व्हीस डायरेक्टर गायत्री पाटील व सार्जंट ऍट आर्म्स हरिष कर्पानी यांचा समावेश आहे.
प्रकाश मिर्जी यांनी कार्यकारिणीला अधिकारसूत्रे देवून त्यांची कर्तव्ये स्पष्ट केली, याप्रसंगी रोटरी क्लब नॉर्थच्या अध्यक्षा संगीता ठाकुर, सचिव विजय गाडवी, तसेच रोट्रक्टचे समन्वयक रसूला अरबार, माजी अध्यक्ष इरफान शेखाली, मेहुल शहा, अनिकेत जाधव आदी उपस्थित होते.