वारखंडे उड्डापुलावर दारू पाटर्य़ा जोरात : पोलिसांनी लक्ष ठेवण्याची गरज,अर्ली बर्ड स्वयंसेवकांतर्फे उड्डाणपुलावर स्वच्छता मोहीम
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा-पणजी महामार्ग एन एच 4ए मार्गावरील वारखंडे येथील उड्डाणपूलावर रात्रीच्या काळोखात मौजमजा, बाईकचा थरार, दंगामस्ती, बियर-सिगारेटची झिंगीनंतर काचेच्या बाटल्या फोडण्य़ाचा प्रकार वाढत आहे. उड्डाणपुलावर टाकून दिलेल्या बाटल्या फोंडयातील अर्ली बर्ड संस्थेच्या निसर्गप्रेमीनी एकत्रित करून फोंडा पालीकेच्या सुपुर्द केल्या. गोवा मुक्तीदिनाच्या औचित्य साधून त्यांनी ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात उड्डापुलावर दुचाकी थ्रिलचे सर्रास सुरू होते पोलिसांच्या कारवाईनंतर हे प्रकार कमी झाले मात्र कोळाखाच्या आड बियरच्या बाटल्या घेऊन टाईमपासच्या नावावर घोळक्यात बसण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. निवांत बसल्यानंतर तेथील घाण व ऐवज तिथेच सोडून काचेच्या बाटल्या फोडण्याच्या प्रकारामुळे इतरांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे.
उड्डापुलावर जॅगिंग, सायकलिंग, महिलांना घेतला धसका
सदर उड्डाणपुलाचा वापर फोंडयातील बहुतेक नागरिक आरामात जॉगिंग व निवांत सायकलिंग करताना दिसत होते. मात्र अशा काही प्रकारामुळे सद्या उड्डापुलावर कोणीच फिरकत नाहीत. कारण उड्डाणपूलाच्या पदपथावर फोडलेल्या बाटल्याचा खच पडून होता. अज्ञाताकडून दारू प्राशन केल्यानंतर बाटल्या फोडण्याचे प्रकार होत असल्याने महिलावर्गाने या जागिंग मार्गच बदलून टाकल्याची माहिती एका नागरिकांने दिली.
पोलिसांच्या ‘पिंक फोर्सने कायम लक्ष ठेवणे गरजेचे
टाईमपासच्या नावाखाली युवकांच्या घोळक्यता बसणाऱयाची झडती घेणे आवश्यक आहे. उड्डाणपुलावर बिनधास्त दारूच्या बाटल्या लपवून बसताना फेंडय़ातील गस्तीवरील पोलिसांचे लक्ष जात नाही का, या युवकांमध्ये काहीवेळा युवतीही सर्रास मौजमजा करताना निदर्शनास आलेल्या आहेत. फोंडा पोलीस स्थानकाच्या ताफ्यात हल्लीच ‘पिंक फोंर्स’ महिलांच्या खास सुरक्षेसाठी नवीन पिंक वाहन ताफ्यात जोडलेले आहे. फोंडय़ातील वादग्रस्त ठरत असलेल्या उड्डाणपूलावर पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
उड्डाणपुलाच्या खाली दुचाकीच्या लांबविण्याचे प्रकार
फोंडय़ात दिवसाढवळय़ा चोरीच्या अनेक घटना नोंदी झालेल्य़ा आहेत. उड्डापुलाच्या खाली वारखंडे व हवेली कुर्टी येथे पार्क करून ठेवलेल्या दुचाकी अज्ञात चोरटय़ानी लांबविल्या त्याचा अजून पत्ता लागलेला नाही. उड्डापुलावर बसून धांगडधिंगा करणारे युवकच नंतर दुचाकी चोरीच्या योजना आखतात का? असाही संशय व्यक्त करण्यात येत असून त्यादिशेनेही पोलिसांनी तपास करणे आवश्यक आहे. पोलिस स्थानकावर उपनिरीक्षक निवांत बसून राहण्यापेक्षा गस्तीवरील पोलिस शहरात नाकाबंदीवर हजर राहतात काय यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
कोणताही अनैतिक प्रकार घडण्याअगोदर कारवाई व्हावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. उड्डापुलावरील स्वच्छता मोहीमेत डॉ. रघुनंदन, डॉ. संदेश देसाई, प्रविण प्रभू,. राजेश कीनी, त्रिंबकराज नाईक, विरेद्र सावंत, रोहित काकोडकर, शिवदीप कुरतरकर, अजय धुपेश्वरकर, ब्रिजेश नाईक, अन्ना नाईक यानी सहभागी घेतला. कोचेचे तुकडे वर्गीकृत करून बाटल्या पिशव्यात एकत्रित करून फोंडा पालीकेच्या सुपुर्द करण्यात आल्या. निसर्गप्रेमीनी शहर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही केले आहे.