वृत्तसंस्था/ सिडनी
लंकेचा क्रेकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने लंकेवर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. दरम्यान लंकन संघातील फिरकी गोलंदाज हसरंगा कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती लंकन क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
लंकन संघातील फिरकी गोलंदाज हसरंगा याची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणी त्याला कोरोना बाधा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तो या मालिकेतील तिसऱया टी-20 सामन्यात खेळू शकणार नाही. हसरंगाला काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.