प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा भारतीच्या वतीने लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी मोफत गृहोपचार सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेत यात रुग्णाला दररोज तज्ञ डॉक्टर फोनद्वारे माहिती घेवून वैद्यकीय सल्ला देतात. मानसोपचार तज्ञही मार्गदर्शन करतात. आहार विषयक मार्गदर्शन केले जाते. संघाचे स्वयंसेवक रोज त्यांचा फॉलोअप घेतात. 14 दिवसांच्या सेवेसाठी 1700 रूपये किमतीचे फार्मसी कीट संबंधित रूग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांनी मागणी केल्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये औषधे, एन 95 चे 5 मास्क, हँड सॅनिटायझर 100 मिली, डिजिटल थर्मामीटर 1, पल्स ऑक्सीमीटर 1 दिले जाणार आहे. या सेवेच्या माध्यमातून आजवर सहा रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती संघाचे जिल्हा प्रचार प्रमुख अनिरूद्ध कोल्हापुरे यांनी दिली.
या सेवेचा ज्यांना लाभ हवा आहे, त्यांनी पुढील संघ स्वयंसेवकाशी संपर्क साधावा ः ए वॉर्ड ः मनोज हेर्लेकर (9326012811), बी वॉर्ड ः विशाल कोरे (8793405284), सी वॉर्ड ः सुनील आडवी (8552002697), डी वॉर्ड ः वैभव वेसणेकर (9421286477), ई वॉर्ड ः आंsकार घाटगे (8421307055)