महापालिकेची कारवाई
प्रतिनिधी/मिरज
शहरातील खतीब हॉल येथे लग्न समारंभात गर्दी करून कोरोना नियमांचा भंग केल्या प्रकरणी वधू – वरच्या नातेवाईकांना दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला. महापालिका सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्या पथकाने रविवारी सकाळी ही कारवाई केली.
खतीब हॉलमध्ये एका लग्नात शंभर ते दीडशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांचे पथक कार्यालयात गेले. त्यावेळी सुमारे शंभर ते दीडशे लोक एकत्र जमून जेवण करत असल्याचे दिसून आले. महापालिका पथकाने सदर गर्दीचा व्हिडिओ केला. महापालिकेचे पथक घेताच कार्यालय चालकाने धूम ठोकली. त्यामुळे पथकाने वधू-वरांच्या नातेवाईकांना दहा हजार रुपयांचा दंड केला. सदर दंड वसूल करून दंडाची पावती देण्यात आली. शासनाच्या नव्या नियमानुसार लग्न समारंभात केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतला परवानगी आहे. त्यामुळे गर्दी करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी घोरपडे यांनी दिला.