ऑनलाईन टीम / लडाख :
कडाक्याच्या थंडीमुळे दोनच दिवसांपूर्वी चीनने पूर्व लडाखमधून 90 टक्के माघारी बोलावले होते. त्यानंतर चीनने पुन्हा एकदा आपली त्याठिकाणची तैनाती वाढवली असून, आज भारतीय हद्दीजवळ चिनी हवाई दलाने युद्धसराव केला.
एका वृत्तसंस्थेनेनुसार, पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीजवळ मागील वर्षी ज्या एअरबेसवरुन चीनने लडाखमध्ये आपल्या सैनिकांना मदत पोहोचवली होती, त्याच एअरबेसवरून आज चिनी हवाई दलाच्या 20 हून अधिक लढाऊ विमानांनी युद्धसराव केला. त्यानंतर भारतीय हवाई दलही सक्रिय झाले असून, चिनी हद्दीतील काशगर, होतान, न्यगिची, शिगात्से, नगारी गुन्सा, ल्हासा गोंगकर आणि चमडो पंगटा एअरबेसवर भारताची नजर आहे. उत्तरेकडील सीमेवर भारताने राफेलसह अन्य लढाऊ विमानांचा ताफाही सक्रिय केला आहे.