ऑनलाईन टीम / मेरठ :
मेरठच्या कॅन्टोन्मेंट परिसरात लष्कराचा गणवेश घातलेल्या एका संशयिताला लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने आज अटक केली. चौकशीनंतरगुप्तचर यंत्रणांनी त्याला मेरठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
संजय निवासी असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो गाझियाबादचा रहिवाशी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय निवासी याला मेरठमध्ये एका टेलरने नोकरी दिली आहे. तेथून त्याने लष्कराचा गणवेश मिळवला. पण लष्कराचा गणवेश परिधान करण्यामागचा त्याचा नेमका उद्देश काय होता, याची चौकशी सुरू आहे.लष्कराचा गणवेश परिधान केल्याप्रकरणी त्याच्यावर इन्चौली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास इन्चौली पोलीस करत आहेत.