सावंतवाडी / प्रतिनिधी:
तालुका आरोग्य अधिकारी, या गोष्टीकडे जरा लक्ष द्या अशी हाक मनसेने चे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हणतात कोरोना प्रतिबंध लसीकरण गावा गावामध्ये होत आहे परंतु काही ठिकाणी आपल्या मर्जीतील लोकांना व नातेवाईकांना लस दिली जाते लस काहीजणांना भेटत नाही ग्रामीण भागामध्ये लसीकरण ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य, केंद्र उपकेंद्र या ठिकाणी केले जात आहे तरी काही ग्रामपंचायतीमध्ये लोकांना सकाळी जाऊन लस भेटत नाही त्यामुळे सदर लसीकरण च्या वेळी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आरोग्य विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी नेमणूक करावी व जोपर्यंत आरोग्य अधिकारी येत नाही तोपर्यंत नाव नोंदणी करू नये आज काही ठिकाणी लस् देत असताना ऑनलाइन आहे म्हणून सांगितलं जातं व त्याला लस दिली जाते त्यामुळे काही लोकांना लस मिळत नाही तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार वारंवार सांगत आहे की दोन डोस घेतल्याशिवाय अनेक ठिकाणी फिरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे आमची त्यांना एकच विनंती आहे की आज ग्रामीण भागांमध्ये लस उपलब्ध नाही आहे सिंधुदुर्गातील अनेक जण शेजारच्या गोवा राज्यांमध्ये जाऊन लस घेतात हे आमचे दुर्दैव आहे. काही गावांमध्ये लोकसंख्या तीन ते चार हजार आहे तर त्या ठिकाणी शंभर ते दोनशे तसेच मिळालेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केंद्राकडे जास्तीत जास्त लसीची मागणी करावी व ग्रामीण भागामध्ये लसींचे पुरवठा करण्यात यावे