प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनानंतर सर्वत्रच सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू होत असून आपणही आपल्या शाळेला सॅनिटायझर भेट द्यावा, या उद्देशाने एका लहानग्याने सेन्सरवर चालणारा सॅनिटायझर तयार केला आहे. युटय़ूवर तसेच गुगलवर माहिती गोळा करून घरीच उपलब्ध असणाऱया साहित्याचा वापर करून त्याने हा सॅनिटायझर तयार केला आहे. गणेश मंदिर, शास्त्राrनगर येथील राहणाऱया रौनक राजीव सुनसाळकर याने हा सॅनिटायझर तयार केला आहे. सध्या तो संजय घोडावत शाळेत 6 वीमध्ये शिक्षण घेत आहे. लहानपणापासून मेकॅनिकची आवड असल्याने घरातील मिळेल त्या साहित्यातून तो काहीतरी नवीन बनविण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याने अवघ्या 4 दिवसांमध्ये हा सॅनिटायझर तयार केला असून तो शाळेला भेट देणार आहे.