विक्रीत 25 टक्क्मयांची वाढ : नेस्लेच्या पाच कारखान्यातील उत्पदनात तेजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी मॅगी नूडल्स खाण्यावर अधिक भर दिल्याचे दिसून आले असून मॅगीच्या उत्पादन विक्रीत 25 टक्क्यांची वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले आहे.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे मागील 60 दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प राहिले आहेत. परंतु याच काळात जीवनावश्यक गोष्टींची विक्री मात्र तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. ही खरेदी ऑनलाईन व ऑफलाईनच्या माध्यमातून ग्राहकांनी केली आहे. यात 5 रुपयांच्या पार्लेजी बिस्कीटांची विक्रमी विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे तर आता दुसरीकडे मॅगी नूडल्सलाही ग्राहकांनी मोठी पसंती दिलेली आहे. सध्या काही शहरात मॅगी नूडल्सची टंचाई भासताना दिसते आहे. लॉकडाऊनच्या आधी लोकांनी बिस्कीटे आणि मॅगीचा मोठा स्टॉक लोकांनी करून ठेवला होता. सुमारे 60 दिवसांनंतर स्टॉक संपल्याने आता पुन्हा मागणी वाढताना दिसते आहे.
ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या मॅगीची विक्री 25 टक्क्मयांनी तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. लॉकडाऊनच्या काळात इंस्टंट नूडल्स मॅगीची खरेदी जोरदार करण्यात आल्याची माहिती नेस्लेकडून देण्यात आली आहे.
नॅस्लेचा व्यापार 12 हजार कोटांवर
संचारबंदीच्या काळात नेस्ले कंपनीच्या पाच कारखान्यांमध्ये मॅगीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. याच काळात नेस्लेचा वार्षिक व्यापार हा 12 हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचला असल्याची माहिती नेस्ले इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायण यांनी दिली आहे.
निवडक उत्पादने जीवाचा आधार लॉकडाऊनच्या काळात देशभरातील विविध उद्योगधंद्यासोबत हॉटेल आणि रेस्टॉरन्ट बंद राहिले होते. यामुळे सर्वसामान्यांनी बिस्कीटे, नूडल्ससारख्या गोष्टींना पसंती दर्शवली आहे. यात प्रामुख्याने पार्लेजी बिस्किट आणि मॅगीला सर्वाधिक पसंती मिळाली असल्याचे समोर आले आहे.