प्रतिनिधी / पुणे
लॉकडाउनमध्ये सिगारेटचा पुरवठा करणाऱ्या डीलरविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून ३७ बॉक्समधील ३९ लाखांच्या सिगारेट जप्त करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली.
या कारवाईबाबत
अधिक माहिती देताना बच्चन
सिंह म्हणाले, सिगारेटचा
एक डीलर कोरेगाव पार्क येथे
सिगारेट विक्री करत असल्याची
माहिती मिळाली. त्यानुसार
तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक
निलेशकुमार महाडीक यांनी एका
व्यक्तीला ग्राहक म्हणून
त्याच्याकडे पाठवले. डीलरने
सिगारेटचा बॉक्स देण्याची
तयारी दर्शवत दुप्पट म्हणजे
पाच हजार रुपये इतकी किंमत
सांगितली.
संबंधित
ग्राहकाने त्याच्याकडून
सिगारेटचा बॉक्स विकत घेतला.
यानंतर पुणे पोलिसांच्या
अमलीपदार्थ विरोधी पथकाने
तेथे धाड टाकून सिगारेटचे ३७
बॉक्स जप्त केले. या
बॉक्स किंमत ३९ लाखांची इतकी
आहे.
दरम्यान,
याप्रकरणी पोलिसांनी
गुन्हा दाखल केला आहे. मात्र,
त्याला अटक करण्यात
आलेली नाही. लॉकडाउन
संपल्यानंतर पोलिसांसमोर
हजर राहण्याचा आदेश त्याला
देण्यात आला आहे.