बेळगाव : / प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय संकटात सापडले आहेत. याला बांधकाम व्यवसायही अपवाद नाही, बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणारे हजारो कामगार अडचणीत आले आहेत. याबरोबर बांधकामासाठी लागणाऱया विविध प्रकारच्या साहित्यांच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना फटका बसत आहे.
कोरोनामुळे बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. यासाठी लागणाऱया लोखंड, सिमेंट व वाळूचे दर वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करणाऱया नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. तर काही ठिकाणी बांधकाम साहित्य वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे बांधकाम क्षेत्रांची कामे रखडली आहेत.
सध्या वाहतूक बंद आहे. त्यामुळे लोखंड सिमेंट दुकानदारांकडे माल उपलब्ध नाही. परिणामी किंमती वाढल्या आहेत. जो माल शिल्लक आहे तो चढय़ा दराने विकला जात आहे. परिणामी नागरिकांना अधिक दराने लोखंड व सिमेंट खरेदी करावे लागत आहे.
शहरासह ग्रामीण भागात लोखंड व सिमेंट विक्री करणारी दुकाने आहेत. या दुकानातून पुरेसा माल उपलब्ध नाही. त्यामुळे लोखंड आणि सिमेंटचे वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना फटका बसत आहे. गेल्यावषी अतिपावसामुळे बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला होता. पुन्हा कोरोनामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. परिणामी या व्यवसायावर रोजंदारीवर पोट भरणाऱयांचीही उपासमार होत आहे. त्यातच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवरील काम करणाऱया गरजूंना अन्यत्र काम मिळणेही दुरापास्त होऊन बसले आहे.