धोका पत्करून जनावरांवर उपचार : पशुवैद्यकीय दवाखाने जनावरांसाठी ठरले आधार
सुनील राजगोळकर /बेळगाव
कोरोनाच्या दुसऱया लाटेत सर्व काही बंद होते. दरम्यान, केवळ अत्यावश्यक गोष्टींना मुभा देण्यात आली होती. अशा कोरोना संकटकाळात जिल्हय़ातील विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांतून लाखो मुक्मया पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या कठीण काळात पशुवैद्यकीय दवाखाने जनावरांसाठी आधार ठरले आहेत.
कोरोनाकाळात प्रत्येकालाच आपल्या जीवाची काळजी होती. अनोळखीच काय ओळखीच्या क्यक्तीपासूनही माणसे चार हात लांब राहत होती. अशा परिस्थितीत पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी धोका पत्करून पशुपालकांच्या जनावरांना बिनधास्त सेवा पुरविली आहे. कोरोनाचा संसर्ग दुसऱयांदा वाढल्याने साधारण एप्रिल महिन्यापासून सर्व काही बंद करण्यात आले होते. दरम्यान, मेडिकल, हॉस्पिटल वगळता बाजारपेठ, मॉल, दुकाने, सरकारी कार्यालये बंद होती. दरम्यानच्या काळात जिल्हय़ातील सर्व लहान-मोठय़ा पशुवैद्यकीय दवाखान्यांतून अविरत सेवा देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक गावांत गावबंदी होती. खासगी डॉक्टरांनीदेखील सेवाबंद केली होती. याकाळात पशुवैद्यांनी पशुपालकांच्या घरोघरी जाऊन जनावरांना आरोग्याच्या सुविधा पुरविल्या आहेत.
जिल्हय़ात 28,09,109 तर बेळगाव तालुक्मयात 1,78,075 इतकी पाळीव जनावरे आहेत. यामध्ये गाय, म्हैस, बैल, मेंढी, मांजर, कुत्रा, गाढव, घोडा, डुक्कर आदींचा समावेश आहे. या पाळीव प्राण्यांवर लॉकडाऊन काळात कृत्रिम गर्भधारणा, रोगनिदान, राष्ट्रीय योजना उपचार, टॅगिंग यासह इतर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. अलीकडे शेतीला जोडधंदा म्हणून गायी, म्हशी पाळणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जनावरांच्या संख्येत वाढ झाली आहे. या जनावरांना लॉकडाऊन काळात आरोग्यासंबंधी अखंडपणे सेवा पुरविल्या आहेत.
बेळगाव तालुक्मयात मुख्य पशुवैद्यकीय दवाखान्यासह हिरेबागेवाडी, सांबरा, उचगाव, अनगोळ, के. के. कोप्प, हुदली, कडोली, संतिबस्तवाड, येळ्ळूर, बेळगुंदी, आंबेवाडी, काकती, सुळेभावी, महांतेशनगर, वडगाव, हलगा, निलजी, नंदिहळ्ळी, किणेय आदी ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांतून सेवा देण्यात आली आहे.
2870 पाळीव प्राण्यांवर मे महिन्यात उपचार
सन्मान हॉटेलसमोरील पशुवैद्यकीय पॉलिक्लिनिक दवाखान्यात दररोज 80 ते 100 जनावरांवर उपचार होत आहेत. या ठिकाणी कुत्रे, मांजर, डुक्कर, शेळय़ा-मेंढय़ा यासह पक्ष्यांवर उपचार होत आहेत. शिवाय या ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळेत रक्त तपासणी व अवघड शस्त्रक्रिया केल्या जातात. या पॉलिक्लिनिकमधून एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान 2870 पाळीव प्राण्यांच्या विविध आजारांवर उपचार करण्यात आले आहेत.
कोरोनाचा जनावरांना धोका नाही
लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार बंद होते. मात्र, खात्यामार्फत एक दिवसही सेवेत खंड न ठेवता जनावरांना सेवा देण्यात आली आहे. कोरोनाचा जनावरांना कोणताही धोका नाही. मात्र, घरोघरी जाऊन सेवा देताना धोका असतो. इतर शासकीय कार्यालये बंद असतानाही पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी धोका पत्करून दररोज दवाखान्यात येणाऱया जनावरांना सेवा पुरविली.
-डॉ. अशोक कोळ्ळा (उपनिर्देशक पशुपालन व पशुवैद्यकीय सेवा खाते, बेळगाव)
जिल्हय़ातील तालुकानिहाय जनावरांची संख्या
तालुका | गाय व बैल | म्हैस | मेंढी | शेळी | डुक्कर |
अथणी | 77917 | 128149 | 47675 | 70420 | 4331 |
बैलहोंगल | 55561 | 55513 | 32398 | 26466 | 1806 |
बेळगाव | 56469 | 76541 | 308590 | 27479 | 1285 |
चिकोडी | 45771 | 138415 | 130273 | 51367 | 1338 |
गोकाक | 94043 | 115243 | 118977 | 95838 | 6569 |
हुक्केरी | 39198 | 89868 | 120770 | 57890 | 3121 |
खानापूर | 45847 | 45240 | 434 | 13180 | 36 |
रायबाग | 77682 | 112699 | 106185 | 57094 | 731 |
रामदुर्ग | 51591 | 33690 | 107938 | 51680 | 2659 |
सौंदत्ती | 48754 | 34012 | 93415 | 40131 | 3729 |