प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य सोसायटीच्या भाग्यनगर शाखेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शाखेच्या महिला व्यवस्थापक ज्योती गंभीर यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले. विभागिय कार्यालयातील छाया दोडमणी व सभासद श्रुती पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाला खातेदार रंजना पुणेकर, सोनिया आंबेवाडीकर, भारती पाटील, लिना अष्टेकर, श्रुती पाटील, स्नेहल पाटील, अनिता जाधव, वृषाली आंबेवाडीकर, संध्या गावडे, रजनी नाडगौडा, जान्हवी जांबोटकर, दिपीका तारीहाळकर, नमिता जांबोटकर, कोमल जाधव, सहाय्यक व्यवस्थापक निशांत जाधव, मयुर खटावकर, सुधीर कालकुंद्रीकर, विनोद नार्वेकर, भुषण बर्डे, सुधाकर धाडवे उपस्थित होते.