प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने लोकमान्य धनसंपदा आवर्ती ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सभासदांना 3 फायदेशीर व सोयीस्कर पर्याय दिले आहेत. ‘प्लॅन ए’मध्ये 18 महिने, ‘प्लॅन बी’मध्ये 24 महिने व ‘प्लॅन सी’मध्ये 36 महिने गुंतवणुकीचे सुलभ पर्याय आहेत. प्रत्येक प्लॅनमधील आवर्ती ठेव योजनांवर आकर्षक असा व्याज दर आहे.
लोकमान्य सोसायटी नेहमीच आपल्या सभासदांसाठी फायदेशीर अशा गुंतवणूक योजना अंमलात आणते. सद्यपरिस्थितीत जास्तीत जास्त बचत करणे ही सर्वसामान्यांची गरज असते. त्याला अनुसरूनच लोकमान्य सोसायटीने ही योजना सुरू केली आहे. या योजनेत काही अटींवर सुलभ कर्जाची सोय पण देण्यात आली आहे. तसेच मुदतपूर्व रक्कम काढण्याचीही सोय आहे. तरी सभासदांनी व जनतेने या योजनेत भाग घेऊन लाभ घ्यावा, असे सोसायटीतर्फे आवाहन केले आहे.
गेली 26 वर्षे लोकमान्य सोसायटी आकर्षक व्याजदर देणारी संस्था म्हणून लोकप्रिय आहे व या योजनेतदेखील सहभागी होणाऱया सभासदांना आकर्षक असा परतावा मिळणार आहे. सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून लोकमान्य सोसायटीने याआधीच लोकमान्यता मिळविली आहे. 213 शाखांच्या विस्तीर्ण माध्यमातून ग्राहकांना आपुलकीची सेवा मिळत आहे. सुरक्षितता, पारदर्शकता, व्यावसायिकता व विश्वासार्हता या ब्रीद वाक्मयांवर लोकमान्य सोसायटीची यशस्वी घोडदौड सुरू आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेत संपर्क करा किंवा टोल फ्री नंबर 1800 212 4050 वर कॉल करावा, असे सोसायटीच्यावतीने कळविण्यात आले आहे.