गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांची टीकाःसाकव बांधून पूल उभारल्याचे सांगणारे नाईक हेच खरे‘फटिंग’
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवड अजून झालेली नसून 27 रोजी यासाठी खास बैठक बोलाविण्यात आली आहे. नगराध्यक्षपदासाठी अजूनही उमेदवार निश्चित झालेले नाहीत. परंतु 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठीचे बिगुल गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी बुधवारी वाजविले आहे. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी कोणताही विकास केला नसल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न माजी आमदार दामू नाईक यांनी करू नये. त्यांच्या 10 वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी काय केले ते लोकांना सांगावे. साकव बांधून पूल उभारला म्हणून सांगणारे नाईक हेच खरे फटिंग असल्याची टीका या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेतून केली.
फातोर्डाचा खरा विकास हा विजय सरदेसाई यांच्या मागील 9 वर्षांत झाला आहे, असा दावा बहुतेक नगरसेवकांनी केला. रस्ते, भू-गटार, भूमिगत वीजवाहिन्या, पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांसह फातोर्डासाठी वेगळे पोलीस स्थानक, पारपत्र कार्यालय, टपाल कार्यालय यासह आंतरराष्ट्रीय स्तराच्या धर्तीवर मासळी मार्केट सुशोभिकरण, अनुसूचित जमातींतील शेतकऱयांसाठी सुविधा असे कित्येक उपक्रम सरदेसाई यांनी राबविल्याचे या नवनिर्वाचित नगरसेवकांनी फातोर्डा येथील पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
रोजगारावरून अपप्रचार अयोग्य : फालेरो
सरदेसाई यांनी रोजगार उपलब्ध केले नसल्याचा अपप्रचार माजी आमदार नाईक यांनी चालविला असून सरदेसाई यांनी मोठय़ा संख्येने सरकारी आणि खासगी क्षेत्रांत फातोर्डावासियांना रोजगार मिळवून दिला असल्याचे प्रभाग 23 च्या नगरसेविका निशिमा फालेरो यांनी सांगितले.
नाईक यांनी कोणत्याच पदावर संधी दिली नाही : पूजा नाईक
आपण भाजप व नाईक यांच्या आधी कार्यकर्त्या होते. मात्र त्यांनी कोणत्याही साध्या पदावर आपणास संधी दिली नाही. तर सरदेसाई यांनी नगरसेविका म्हणून निवडून आणून आपणास भंडारी समाजातील पहिल्या नगराध्यक्षा बनण्याचा मान युवादशेत दिला, असे प्रभाग 4 च्या नगरसेविका पूजा नाईक यांनी नजरेस आणून दिले.
नाईक यांना पहिल्यांदा आपण आमदार बनविले ः राजू नाईक प्रभाग 11 चे चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले राजू नाईक यांनी माजी आमदार नाईक यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. आपण प्रथम नगरसेवक बनलो आणि नाईक त्यांनी आपणास दोन वेळा नगरसेवक बनविले असे सांगून लोकांची निवडणूक काळात दिशाभूल करत होते. खरे तर नाईक यांना पाजीफोंड प्रभागातून विजयी मताधिक्मय मिळवून देऊन आपणच त्यांना पहिल्यांदा आमदार बनविले होते, असा दावा नगरसेवक नाईक यांनी केला. यावेळी नगरसेवक फ्रान्सिस जोनिस, लिंडन पेरेरा, जॉनी क्रास्टो, रवींद्र नाईक, स्वेता लोटलीकर यांनी आमदार सरदेसाई यांनी राबविलेल्या विकासकामांचे समर्थन करताना माजी आमदार नाईक मांडत असलेले मुद्दे खोडून काढले.