वार्ताहर / वेंगुर्ले:
वजराट-पिंपळगाव येथील स्नेहांकिता संजय देसाई (22) ही युवती रविवार 26 जानेवारीपासून बेपत्ता झाली आहे. या संदर्भात तिचे वडील संजय देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेपत्ताची तक्रार वेंगुर्ले पोलिसांत दिली आहे.
वेंगुर्ल्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामाला असलेली स्नेहांकिता 26 रोजी सकाळी कामावर गेली. ती सायंकाळी घरी आली नसल्याने तिच्या बहिणीने तिची चौकशी केली असता हॉस्पिटलमध्ये काम असल्याचे तिने सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यत ती घरी न परतल्याने वडील संजय बहिर्जी देसाई यांनी वेंगुर्ले पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन सावंत हे करीत आहेत.