प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर, वडगाव, खासबाग परिसरातील मटका अड्डय़ांवर कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. शहापूर पोलिसांनी गेल्या 24 तासात एका महिलेसह चौघा जणांना अटक केली असून मुख्य बुकीवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 32 हजार 865 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या आहेत.
येळ्ळूर रोड, वडगाव येथील पिंपळकट्टय़ावर मटका घेणाऱया जयश्री गोपाळ गडाद (वय 32) या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून तिच्या जवळून 4 हजार 995 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या आहेत.
नितीन पांडुरंग पेडणेकर उर्फ पेरनुरकर (रा. शहापूर) याला आपण चिठ्ठय़ा पोहोचवत असल्याची कबुली या महिलेने दिली आहे. त्यामुळे बुकी नितीनवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. आय. सनदी यांनी यासंबंधी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
दुसरी कारवाई बसवाण गल्ली, खासबाग येथे करण्यात आली. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी किरण विष्णू खोराटे (वय 32, रा. भारतनगर, शहापूर), मंजुनाथ गणपती कामकर (वय 29, रा. भारतनगर, शहापूर) या दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून 18 हजार 920 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या आहेत. या दोघा जणांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन पेडणेकर उर्फ पेरनुरकर याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई बुधवारी हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथे करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ पाटील यांनी सुभाष ठक्काप्पा बेकवाड (वय 52) याला अटक करून त्याच्या जवळून 8 हजार 950 रुपये व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त केल्या आहेत. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.