दोन बकऱयांचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी : शेड जळून खाक
प्रतिनिधी /बेळगाव
रामदेव गल्ली-वडगाव येथील जनावरांच्या शेडला आग लागून दोन बकऱयांचा मृत्यू झाला तर तीन बकरी गंभीर जखमी झाली आहेत. आगीत शेड जळून खाक झाले आहे. महादेव सुगणे यांच्या शेडला बुधवारी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या शेडमध्ये 9 बकरी व शेळी बांधण्यात आल्या होत्या. यापैकी दोन बकऱयांचा मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पाण्याचे फवारे मारुन जवानांनी आग विझविली आहे.