प्रतिनिधी/ सातारा
विघ्नसंतोषी मंडळींकडून अजिंक्यतारा किल्ल्याला दरवर्षी वणवा लावला जातो. गेल्या चार पाच दिवसांपूर्वी वणवा लावण्याचे प्रकार घडत होते. तीन दिवसांपूर्वी किल्ले अजिंक्यताऱयाला वणवा लावणारा चारुदत्त पांडुरंग देशपांडे (वय 62, रा. मंगळवार पेठ) हा वनविभागास व वणवा आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या युवकांना सापडला. त्यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालायाने 5 हजार रुपयांचा दंड व दंड न दिल्यास दहा दिवसाचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली असून सातारा वनविभागाच्यावतीने वणवा लावणाऱयास शिक्षा झाल्याची पहिलीच घटना समोर आली आहे. दरम्यान, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे वणवा लावणाऱयाची माहिती देणाऱयास 11 हजार बक्षिस देणार असे सांगितले होते. त्याप्रमाणे वणव्याची माहिती देणाऱयांचा बक्षिस देऊन राजेंद्र चोरगे सत्कार करणार आहेत.
किल्ले अजिंक्यताऱयाला दरवर्षी विघ्नसंतोषी मंडळीकडून वणवा लावण्याचे प्रकार घडतात. साताऱयातील पर्यावरणप्रेमी, सातारा पालिकेचा अग्निग्नशामक विभाग वनविभाग हा वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतात निसर्गसंपदा जपण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र दरवर्षी वणवा लागत असतो. यावर्षीही किल्ले अजिंक्यताऱयाला वणवा लागण्याचा प्रकार घडला होता. वणवा लागताच सातारा वन विभाग आणि साताऱयातील वन्यप्रेमी वणवा आटोक्यात आणण्यासाठी गेले होते. वणवा आटोक्यात आणताना तेथे मंगळवार पेठेतील चारुदत्त देशपांडे हे निदर्शनास आल्याने त्यांना विचारणा केली असता त्यांनी वणवा लावल्याची कबुली दिली. त्यावरून वनविभागाने त्यांना ताब्यात घेतले. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास यास दहा दिवसाची पोलीस कोठडी अशी शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा प्रथमच झाली आहे. त्याबाबत सातारा वन विभागाचे कौतुक होत आहे.
ही कारवाई सातारचे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, वनपाल, वनरक्षक, भरतगावचे वनरक्षक, कुसावडेचे वनरक्षक, कायम वनमजूर गोरख शिरतोडे यांनी केली. वणवा आटोक्यात आणण्यासाठी शेखर चव्हाण, सुमित वाघ, शैलेश देशमुख यांनी सहकार्य केले. जंगलाचे संवर्धन करूया निसर्ग वाचवूया कोणीही वणवा लावू नये असे आवाहन सातारचे वनपरिक्षेत्राधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी केलेले आहे.
बक्षिसाचा मानकरी माहिती देणारा युवक
बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी केले अजिंक्यतायावर वणवा लावणाऱयाची माहिती दिल्यास व माहिती देणाऱयास अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल अशी घोषणा केली होती. घोषणा केल्याप्रमाणे वणवा लावणाऱयाची माहिती देणाऱया युवकास बक्षिसाची रक्कम देण्यात आली येईल अशी माहिती राजेंद्र चोरगे यांनी यावेळी दिली.
वणवा लावणाऱयास सिगारेटची तलफ
वणवा लावताना आढळून आलेला चारुदत्त देशपांडे हा दररोज न चुकता किल्ले अजिंक्यताऱयावर फिरायला जात असायचा. त्याला सिगारेटची तलफ असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याने स्वतः वनविभागाकडे वणवा लावल्याचे कबुली दिल्याने अशा मंडळींना गडावर जाण्यास मनाई करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.