कंग्राळी बुद्रुक : वनखात्याचे मुख्य संरक्षक अधिकारी बसवराज पाटील यांचा पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून नुकताच शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बसवराज पाटील यांनी भुतरामहट्टी येथील पार्क व मच्छे येथील फॉरेस्ट पार्कचे उत्तम प्रकारे काम करून दोन्ही पार्कच्या सुशोभीकरणात चांगली भर घातली. त्यामुळे वन्यप्रेमी व पर्यावरणप्रेमी मल्लेश चौगुले, पृथ्वीसिंग, यल्लोजी पाटील यांच्यातर्फे त्यांचा सत्कार केला. बेळगावात प्राणी संग्रहालय उभारण्याची मागणी
बेळगाव येथे प्राणी संग्रहालय उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. संग्रहालयामध्ये वाघ, सिंह, हत्ती अशा मोठय़ा प्राण्यांना ठेवावे व म्हैसूरमध्ये जसे ‘झू’ पार्क आहे त्याच धर्तीवर बेळगावमध्येही ‘झू’ पार्क निर्माण करावे, अशी मागणी केली. बसवराज पाटील सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले, कोरोना महामारीमुळे आमच्या खात्याकडे निधीचा तुटवडा आहे. तेव्हा आपण सर्वजण मिळून बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना निवेदन देऊ. बेळगावमधील सर्व आमदारांनी प्राणी संग्रहालय उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे विचार मांडले.