तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यातही भारताचा 73 धावांनी खणखणीत विजय
कोलकाता /वृत्तसंस्था
रोहित शर्माचे तडाखेबंद अर्धशतक आणि अक्षर-हर्षल या ‘पटेल बंधूं’च्या भेदक माऱयाच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा येथील तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात 73 धावांनी एकतर्फी फडशा पाडला आणि या मालिकेत 3-0 असा व्हॉईटवॉश नोंदवला. रविवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या लढतीत भारताने 7 बाद 184 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 17.2 षटकात सर्वबाद 111 धावांवरच खुर्दा झाला.
भारतीय संघातर्फे अक्षर पटेलने 9 धावात 3 तर हर्षल पटेलने 26 धावात 2 बळी घेतले. याशिवाय, दीपक चहर, यजुवेंद्र चहल, वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला.
विजयासाठी 185 धावांचे तगडे आव्हान असताना किवीज सलामीवीर मार्टिन गप्टीलने 36 चेंडूत 51 धावांची खणखणीत खेळी साकारली. मात्र, त्याचा अपवाद वगळता आघाडीच्या चारही फलंदाजांना अतिशय स्वस्तात बाद व्हावे लागले आणि न्यूझीलंडचा संघ येथेच बॅकफूटवर फेकला गेला. अक्षर पटेलने डॅरेल मिशेलला (5) हर्षलकरवी झेलबाद करत पहिला धक्का दिला आणि त्यानंतर चॅपमन (0), फिलीप्स (0) यांचेही पत्ते कापले. यातील चॅपमन पुढे सरसावून उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात पंतकरवी यष्टीचीत झाला तर फिलीप्सचा त्रिफळा उडाला.
गप्टील अर्धशतक साजरे केल्यानंतर चौथ्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला. टीम सेफर्ट धावचीत होत परतल्यानंतर नीशमने हर्षलच्या गोलंदाजीवर पंतकडे झेल दिला आणि सॅन्टनर धावचीत झाल्याने न्यूझीलंडची 7 बाद 84 अशी दाणादाण उडाली. यातून ते शेवटपर्यंत सावरले नाहीत.
धावफलक
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टील झे. यादव, गो. चहल 51 (36 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), डॅरेल मिशेल झे. हर्षल, गो. अक्षर 5 (6 चेंडूत 1 चौकार), मार्क चॅपमन यष्टीचीत पंत, गो. अक्षर 0 (2 चेंडू), ग्लेन फिलीप्स त्रि. गो. अक्षर 0 (4 चेंडू), टीम सेफर्ट धावचीत (इशान-पंत) 17 (18 चेंडूत 1 चौकार), जेम्स नीशम झे. पंत, गो. हर्षल 3 (7 चेंडू), मिशेल सॅन्टनर धावचीत (इशान) 2 (4 चेंडू), ऍडम मिल्ने झे. शर्मा, गो. वेंकटेश 7 (6 चेंडूत 1 षटकार), ईश सोधी झे. यादव, गो. हर्षल 9 (11 चेंडूत 2 चौकार), लॉकी फर्ग्युसन झे. व गो. चहर 14 (8 चेंडूत 2 षटकार), ट्रेंट बोल्ट 2 (2 चेंडू). अवांतर 1. एकूण 17.2 षटकात सर्वबाद 111.
गडी बाद होण्याचा क्रम
1-21 (मिशेल, 2.1), 2-22 (चॅपमन, 2.6), 3-30 (फिलीप्स, 4.4), 4-69 (गप्टील, 10.3), 5-76 (सेफर्ट, 11.4), 6-76 (नीशम, 12.3), 7-84 (सॅन्टनर, 13.1), 8-93 (मिल्ने, 15.1), 9-95 (सोधी, 16.1), 10-111 (फर्ग्युसन, 17.2).
गोलंदाजी
भुवनेश्वर कुमार 2-0-12-0, दीपक चहर 2.2-0-26-1, अक्षर पटेल 3-0-9-3, यजुवेंद्र चहल 4-0-26-1, वेंकटेश अय्यर 3-0-12-1, हर्षल पटेल 3-0-26-2.
ब्लर्ब
उभय संघातील पहिली कसोटी गुरुवारपासून खेळवली जाईल.