ऑनलाईन टीम / तरुण भारत
रविवारी सकाळच्या सुमारास राजस्थानातील कोटा येथे मोठी दुर्घटना घडली असुन या दुर्घटनेत 9 वऱ्हाडींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोटा येथे वऱ्हाडींना घेऊन जाणारी कार चंबळ नदीत कोसळली असुन यात नवरदेवासह 9 चा मृत्यू झाला आहे. नयापुराजवळ ही घटना रविवारी पहाटे साडेपाच वाजता घडल्याची माहिती समोर आली असुन याबाबत माहिकी मिळताच पोलीसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू केले असुन. नदीत बुडालेल्या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हे वऱ्हाड चौथ का बरवाडा येथून उज्जैनपर्यंत जात होते. रविवारी पहाटे चंबळ नदीत कार उलटताना एका प्रवाशाने पाहिली. यानंतर महामंडळाच्या गोताखोरांच्या पथकाने पहाटे बचावकार्य हाती घेतले. क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. सर्व मृतदेह एमबीएसच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.