प्रतिनिधी / कुडाळ:
भारतातील एक महत्त्वाचा ‘इको हॉटस्पॉट रिजन’ म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा आता स्वतःची एक नवी ओळख निर्माण करत आहे. पक्षी वैविध्यतेपासून ते प्राणी आणि किटकांच्या लाखो प्रजातींचे माहेरघर असलेला हा भूभाग आता वन्यजीव पर्यटनाच्या एका नव्या पर्वात पाऊल टाकत आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील वैविध्यपूर्ण वन्यजीव संपत्तीचा उलगडा करणारी ‘वाईल्ड सिंधुदुर्ग’ या डॉक्मयूमेंट्रीचा ट्रेलर निसर्गप्रेमींच्या भेटीला येत आहे.
महाराष्ट्र वनविभाग यांच्या सहयोगाने व प्राणी तज्ञ डॉ. योगेश कोळी यांच्या प्रयत्नातून साकार होत असलेल्या ‘वाइल्ड सिंधुदुर्ग’ या डॉक्मयुमेंट्रीचे चित्रीकरण सुरु झाले आहे. यात प्रामुख्याने लेपर्ड ह्युमन कॉनफ्लिक्ट, एलिफंट जर्नी इन सिंधुदुर्ग, मायग्रेटरी बर्ड, हिवन फॉर द रेपटाईल्स ऍण्ड फ्रॉग इन आंबोली, ऑलिव्ह रिड्ले टरटल फेस्टिवल ऍण्ड कॉन्झरवेशन हे सहा मुख्य विषय दाखविले जाणार असून गेल्या दोन वर्षांपासून या डॉक्मयूमेंट्रीमध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे विद्यार्थी म्हणजे ‘माय वे जर्नी’या संस्थेचे सदस्य प्रवीण सावंत, प्रवीण जाधव, अक्षय दळवी, गुरुनाथ कदम, श्रीधर पेडणेकर, तेजस सावंत, मयुरी सावंत, हर्षदा मेस्त्री अशी संपूर्ण टीम काम करत आहे.
या डॉक्मयुमेंट्रीचाच एक भाग म्हणून ‘गोल्डन जॅकेल: द मॅजिक ऑफ चिपी प्लॅटु’ प्रदर्शित होईल. ज्यात सिंधुदुर्ग जिल्हय़ातील चिपी सडय़ावरील गोल्डन जॅकेलंची थक्क करून सोडणारी जीवनपध्दती या परिसंस्थेतील त्यांचे महत्त्व आणि मानव वन्यजीव संघर्ष यांच्या कसोटीत त्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष यांचे धगधगते सत्य समोर आणण्याचा प्रयत्न होणार आहे. यानंतर येत्या दोन वर्षात वाईल्ड सिंधुदुर्ग ही मुख्य डॉक्मयुमेंट्रीही प्रकाशित केली जाईल. या डॉक्मयुमेंट्रीतून जिल्हय़ातील शाश्वत वन्यजीव पर्यटन आणि लोकसहभागातून निसर्ग संवर्धन ही बाब डोळय़ासमोर ठेवून काही वैशिष्टय़पूर्ण असे वन्यजीव आणि त्यांची जीवनपद्धती दाखविली जाणार आहे. शिवाय सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हय़ात चालू असलेला मानव-वन्यजीव संघर्ष आणि तो कमी करण्यासाठी सिंधुदुर्ग वन विभाग आणि पर्यायाने स्थानिक जनतेचा सहभाग हेही या डॉक्मयूमेंट्रीतून जगासमोर आणण्याचा प्रयत्न होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आज 26 जानेवारी रोजी या डॉक्मयुमेंट्रीची छोटीशी झलक ‘माय वे जर्नी’ या नवाने सुरू होत असलेल्या यु टय़ूब चॅनेलवर प्रकाशित होत आहे.