प्रतिनिधी/ वाई
वाई तालुक्यातील कोरोनाचा कहर सुरूच आहे.वाई शहर आणि तालुक्यातील 5 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.तर 68 जण नव्याने बाधित झाले आहेत, अशी माहिती तालुका वैधकीय अधिकारी डॉ.सुनील यादव यांनी दिली.
वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 1, ब्राम्हणशाही 1, गणपती आळी 1, गणेश नगर 3, चिंदवली 1, भुईंज 7, उडतारे 5, चिंचणेर वंदन 2, पाचवड 3, आसरे 6, चिखली 1, शुदुजर्णे 3, सुरुर 1, पाचवड 4,कानुर 2, सोनगिरवाडी 3, जांब 2, बावधन 3, सिद्धनाथवाडी 2, वारखडवाडी 1, कवठे 1, परशुराम नगर 1, देगाव 2, अमृतवाडी 1, आकोशी 1, वेलंग 3, धोम कॉलनी 1, वरगडेवाडी 2, बेलमाची 1, व्याजवाडी 1, आदरकी 1, पिराचीवाडी 1 असे रात्रीच्या अहवालात बाधीत आढळून आले.जिल्हा रुग्णालयात वाई येथील 50 वर्षीय पुरुष, शेंदुरजणे ता. वाई येथील 86 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष,वाई येथील 84 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 66 वर्षीय महिला असे मृत आढळुन आले, असे ही त्यांनी सांगितले.