शहरासह वाई तालुक्यातील ग्रामीण भागात जोर
प्रतिनिधी/ वाई
वाई तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.त्यामध्ये शहरासह वाई तालुक्यातील बावधन, उडतारे, भुईंज, पाचवड या गावांचा समावेश होत आहे.वाई शहराबरोबर उपनगराला विळखा पडला आहे.कोरोनाच्या मगरमिठीतून कोणीही सुटले जात नाही.मग ते कितीही कणखर असो.कोरोनाचे रुग्ण सापडत असले तरीही नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत.
वाई शहराबरोबरच लगतच्या भागात रुग्ण आढळून येत आहेत.कोरोना बाधित असल्याचे जेव्हा कळते तेव्हा हलचल उडते.ग्रामीण भागात ज्यांची सोय आहे ते होम आयसोलेशनमध्ये रहात आहेत.मात्र, ज्यांची सोय नाही त्यांची वाई शहरात प्रशासनाने केलेल्या कोरोना सेंटरमध्ये दाखल व्हावे लागते आहे.अनेकजण तेथे कोरोन टाइन आहेत.तर काहीजण घरात उपचार घेत आहेत.काल रात्री आढळून आलेल्यामध्ये वाई तालुक्यातील मांढरदेवी 1, कवठे 1, सोनगीरवाडी 5, सह्याद्रीनगर 1, यशवंतनगर 1, व्याहाळी 1, एमआयडीसी 3, उडतरे 16, जांब 3, कवठे 2, बावधन 3, विराटनगर 1, गंगापूरी 4, भुईंज 6, पाचवड 1, देगांव 1, भोगाव 1, धर्मपुरी 2,ब्राम्हणशाही 6, पसरणी 1, ओझर्डे 1, बावधन नाका 2, कुंभारवाडा 2, रामडोहआळी 4, जाधववाडी 2, रविवार पेठ 5, धोम कॉलनी 2, वाशिवळी 1, नायकवाडी वस्ती 1, फुलेनगर 1, प्राध्यापक कॉलनी 1,केजळ 1, वाई 1,शेलारवाडी 4,बोपर्डी 1, शांतीनगर 1 असे 90 बाधित आहेत.