जिकडे पहावे तिकडे शुकशुकाट
प्रतिनिधी/ वाई
कोरोनाचा वाढत चालेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशाची वाई शहरात कडक ताळेबंदी करण्यात आली आहे. वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी नेटके नियोजन केले आहे. सर्व रस्ते सुनेसुने दिसत होते. नागरिकांनी घरात रहावे बाहेर पडू नका असे आवाहन करणारी पालिकेची रिक्षा प्रबोधन करत फिरत होती. रात्री उशिरा आलेल्या अहवालात वाईकराना धक्का बसला असून शहरातील एकाच कुटूंबातीले 7 जण बाधित तर तालुक्यातील एकूण 19 जण बाधित झाले आहेत.
वाई शहरात दुसऱयांदा लॉकडाऊन सुरू केले आहे. या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून शहरात पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवेच्याच नागरिकांना इंधन ठरलेल्या वेळेत दिले जाते. शहरात कोणीही बाहेर फिरू नये, यासाठी वाई पालिकेच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे. शहरातील सोनगीरवाडी, सिद्धनाथवाडी, ब्राम्हणशाही, धोम कॉलनी यापैकी बहुतेक परिसर हा अगोदरच कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आला आहे. टाळे बंदीत सर्व भाग आता पुन्हा कडक बंद पाळण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशी शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसतं होते.
रात्रीच्या अहवालात वाईकराना धक्का
रात्री उशिरा आलेल्या अहवालात वाई तालुक्यातील 19 जण बाधित आढळून आले आहेत. त्यात वाई शहरातील ब्राम्हणशाही येथील एकाच कुटुंबातील 7 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच वाई शहरालगत असलेल्या यशवंतनगर ग्रामपंचायतीतील गुलमोहर कॉलनी एकाच कुटूंबातले 8 बाधित झाले आहेत.तर हॉट स्पॉट ठरलेल्या आसले येथे नव्याने 2 ,भुईंज 1 ,धोम पुनर्वसन (ओझर्डे) 1 असे बाधित आढळून आले आहेत, अशी माहिती प्रांत कार्यलयातून देण्यात आली.