प्रतिनिधी / गारगोटी
वाघापूर या.भुदरगड येथील अनुराधा सुशांत बरकाळे (वय 19 ) हिने रहात्या घरी आत्महत्या केली. याबाबतची नोंद भुदरगड पोलीसांत झाली आहे. अवघ्या सहा महिन्या पुर्वी त्यांचे लग्न झाले असून संसाराची स्वप्ने रंगावण्यापुर्वीच आपली जीवनयात्रा संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील सुशांत साताप्पा बरकाळे भारतीय सैन्य दलात आहे. त्यांचे मडिलगे बु येथील अनुराधा मालवेकर हिचेशी सहा महिन्या पुर्वी लग्न झालेले आहे. सुशांत याने ही जिद्दीने पाच वर्षे सराव करून भारतीय सैन्य दलात भरती झालेला आहे. तो सध्या रांची येथे कार्यरत आहे.
वाघापुरात एक कष्टाळु कुंटूबीय म्हणून परिचीत आहे. आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. रक्षाबंधनाच्या पुर्व संध्येला दुःखद घटना घडल्याने वाघापूर धरा शोककळा पसरली.