प्रंटलाईन वॉरिअर पोलीस जायबंदी, तरीही कोरोनाशी लढा सुरूच
प्रतिनिधी/ फोंडा
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कारोनाबाधित रूग्णामध्ये सामान्यबरोबर प्रंटलाईन वॉरिअर्स म्हणून काम करणाऱया पोलीस कर्मचाऱयाचाही समावेश झालेला आहे. फोंडा पोलिस स्थानकात मागील आठ दिवसात तब्बल 27 पोलीस कर्मचारी व 1 रूग्णवाहिका सहाय्यक कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला आहे. पोलिसांची कोरोना चाचणी केल्यानंतर विलगीकरणाची सोय न झाल्याने कोरोनाबाधितांच्या कुटूंबियांपैकी सुमारे 16 जण तसेच अन्य 14 जण पॉझिटीव्ह आढळून आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे फोंडा शहरात पोलीस स्थानकच कोविड-19चे हॉटस्पॉट बनले आहे. सद्या खबरदारीची उपाययोजना म्हणून लोकांना स्थानकात प्रवेश बंदी केलेली आहे. तक्रारीचे निवारण स्थानकासमोर उभारण्यात आलेल्या तंबूतून करण्यात येत आहे.
1 जूलै पासून फोंडा पोलीस कर्मचाऱयांना दिवसेंदिवस कोरोनाची लागण झाल्याच्या घटना वाढत असल्याने पोलीस स्थानकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही पोलीस कर्मचाऱयांचे पहिल्या चाचणीत अहवाल नकारात्मक आल्यानंतर दुसऱया चाचणीत अहवाल सकारात्मक आढळलेला आहे. यामध्ये आठ दिवसापुर्वी वेर्णा पोलीस स्थानकातून फोंडयात बदली झालेले निरीक्षक हरीष मडकईकर यांचाही समावेश आहे. त्याच्यासह 4 उपनिरीक्षक, 4 हवालदार, 9 कॉन्स्टेबल, 1 महिला हवालदार, 2 महिला कॉन्स्टेबल, एसबी खात्याचे 3 कॉन्स्टेबल तसेच 3 होमगार्ड व 1 रूग्णवाहिका सहाय्यक कोरोनाबाधितात समावेश आहे.
डय़ुटीवरील पोलीसांचे हाल, स्वत: पुढाकार घेत विलगीकरण
कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्यानंतर तब्बल सात दिवसानंतर फोंडा पोलीस स्थानकासमोर तक्रारीच्या निवारणीसाठी येणाऱयांना मंडप उभारण्यात आला आहे. येथील कोविड वॉरिअर्सची तपासणी केल्यानंतर विलगीकरणासाठी कोणतीच उपाययोजना करण्यात आली नव्हती. एवढया दिरंगाईला जबाबदार कोण? अशा प्रकारामुळे पोलिसांच्या कुटूंबियांनाही लागण झालेली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी आपल्या जीवावर उधार होऊन कर्तव्य बजावले. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे असे आवाहन सरकार करते, त्यावेळी पोलिसांनी रस्त्यावर सतर्क रहावे लागत होते. मात्र आता त्यानाही कोरोनाची लागण मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसत आहे तेव्हाही सरकार त्याच्याकडे गंभीरतेने बघत नसल्याची खंतही काही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सणासुदीच्या ते निवडणूकापर्यंत, कायदा सुव्यवस्था ते तंटे थोपविण्यासाठी प्रुटवर काम करणाऱया पोलिसांवरच स्वत:च्या आरोग्याची स्वत: काळजी घेण्याची पाळी आली आहे. आरोग्य अधिकाऱयाना मिळणाऱया सुविधेइतक्या पुरेश्या सुविधा पोलिसांना मिळत नसून मात्र खबरदाराची उपाययोजनापुरत्या तरी सोयी पुरवा असा टाहो पोलीस फोडत आहेत. फोंडय़ाचे निरीक्षक हरीष मडकईकर कोरोना लढय़ात जायबंदी झाल्यामुळेही येथील डय़ुटीवर असलेल्या कर्मचाऱयावर बाका प्रसंग उद्भवलेला आहे. फोंडा पोलीस स्थानकाचा तात्पुरता ताबा वाळपईच्या निरीक्षकांवर असून तेही याकामी तेवढे लक्ष ठेवण्यास अपुरे पडत आहेत.
नेमका संसर्ग झाला कोठून
फोंडा पोलीस स्थानकात नेमका संसर्ग कोठून झाला हे अजून स्पष्ट झालेला नाही. 23 जून रोजी ताबा घेतलेले निरीक्षक हरीष मडकईकर हे वेर्णा पोलीस स्थानकात कार्यरत होते. तसेच फोंडा पोलीस स्थानकाशी निगडीत एक कॉन्स्टेबल साखळी येथील कोरोनाबाधित क्षेत्रातील आहे. दोघेही कोरोना पॉझिटीव्ह सर्वात आधी सापडलेले असल्यामुळे संसर्ग नेमका कोणामुळे झाला हेच स्पष्ट झालेले नाही. याची दखल घेत पोलीस उपमहानिरीक्षक परमादित्य दक्षिण गोवा अधिक्षक पंकजकुमार यांनी फोंडा पोलीस स्थानकाचा आढावा घेतला संपुर्ण पोलीस स्थानक परीसर र्निजंतुकीकरण करण्यात आले. यावेळी पोलिस स्थानकाला सेनिटारझर व मास्क पुरविण्यात आले.
पोलीसांच्या कुटूंबापैकी बायका-मुलेंही क्वारंटाईनमध्ये तसेच हवालदारांच्या व होमगार्डची संपुर्ण कुटूंबिय क्वारंटाईनमध्ये गेले आहे. इतरांना मिळून 30 हून अधिक आकडा पोचलेला आहे. कोरोनाच्या संकटात अहोरात्र झटणाऱया पोलिसामध्ये या विषाणूंच्या संसर्ग झपाटय़ाने होत आहे. बाजारात गर्दीचा माहोलावर कोणाचेच नियंत्रण नाही. नियम मोडणाऱयावर कारवाईचे काम मात्र पोलिसांनाच करावे लागत आहे. नागरिक नियम पाळत नसल्याचे पोलिसांवर ताण अधिक वाढत आहे.
पोलिसांना तपासकामासह, गुन्हा दाखल करणे, अपघातास्थळी, अनैसर्गिक मृत्यूंचा पंचनामा अशा सर्वामध्ये पोलिसांचा थेट संपर्क येत असल्यामुळे डय़ुटीनंतर थेट घरी जाण्याचे पोलीस टाळत आहे. असे न केल्यास पोलीस कोरोनाबाधित झाल्याचा फटका त्यांच्या कुटूंबियांनाही बसण्याचा धोका संभवत असल्यामुळे काहींनी या घटनेनंतर पोलीस स्थानकातच कोंडून घेतलेले आहे. गेले कित्येक दिवस कुटूंबियांचे दर्शनही घेतलेले नाही.
दुकानदारही देतात दुजाभावाची वागणूक
फोंडा पोलिसांना दुकानदार दुजाबावाची वागणूक देण्याचे प्रकार सद्या सुरू आहेत. केश कर्तनालयात, फार्मसी, तसेच बाजरात फिरतानाही दुकानदार संशयाच्या नजरेने पाहत आहेत. फोंडा पोलिसांच्या संपर्कात आल्यास संसर्ग होईल अशी भिती त्याच्या मनात घर करू लागली असल्याचे चित्र दिसत आहे. दुकानदारांने हे विसरू नये की त्याना सरकारने घालून दिलेली एसओपी तत्वानुसार कोणालाही संशयाने बघू नये.जर संशयाने बघण्याचा दृष्टीकोन बदलणेश शक्य नसल्यास दुकान न उघडता घरी सुखरूप रहावे अशी संतत्प प्रतिक्रीया एका पोलिसांने दिली आहे.
कुटूंबियांच्या सुरक्षितेपोटी स्वत:हून विलगीगकरण आपल्या कुटूंबियांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचे उपाय म्हणून काही पोलीस कर्मचाऱयांना एका हितचिंतक व्यवसायिकांने ढवळी येथील एका खासगी हॉटेलच्या खोल्या पुरविल्याने मोठा आधार झालेला आहे. सुमारे 15 पोलिसांनी आपला कोरोना चाचणी अहवाल नेगेटीव्ह आल्यानंतरही घरी न जाता येथे थांबण्याची खबरदारी घेतलेली आहे. काहीची सोय बॅरकमध्ये तर काहीची क्रीडा प्रकल्पाच्या सभागृहात केली असून काहीनी आपल्यापरीने कामावरून सुटल्यानंतर घराच्या एका वेगळया खोलीत विलगीकरणाचे व्रत पाळण्य़ाची वेळ आलेली आहे. अशा कोरोनाच्या महामारीच्या संकटकाळात जनतेच्या सवेसाठी कोविड योद्धे म्हणून भूमिका बजावणाऱया फोंडा पोलीस तब्येत सुधारावी हीच सदिच्छा.