प्रतिनिधी / सांगली
सांगली शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात शनिवारी तिरडी मोर्च्या काढण्यात आला. वाढीव पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले, सध्या संपूर्ण भारतात पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य माणसाला याची मोठी आर्थिक झळ बसत आहे. तर केंद्र सरकारचे याकडे लक्ष नाही. म्हणून आज शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक केंद्र सरकारच्या पुतळ्यासह तिरडी मोडून निदर्शने करण्यात आली.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय विभूते, उप जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर, रावसाहेब खोचगे, तालुकाप्रमुख मारुती पवार, सुरज पाटील, प्रशांत लेंगरे, अमोल काळे, मिरज विधानसभा अध्यक्ष तानाजी सातपुते, शहरप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे, युवासेना समन्वयक सचिन कांबळे, हरी लेंगरे, रुपेश मोकाशी, अनिल बाबर, संजय चव्हाण, संजय देसाई, पप्पू शिंदे, संदीप ताटे, सनत पाटील, संतोष पाटील, सारंग पवार, दादा जगताप, अभिजित सावंत, अर्जुन निकम, तानाजी खांडेकर , प्रदीप पाटील,
किरण पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.