ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
वायदे बाजारात सोने-चांदीच्या भावात मंगळवारी घसरण झाली. एमसीएक्समध्ये एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचे वायदे बाजारातील दर 259 रुपयांनी म्हणजेच 0.57 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 45,049 रुपये झाले. मे महिन्याच्या डिलिव्हरीसाठी चांदीचे वायदे 1050 रुपये म्हणजेच 1.53 टक्क्यांनी घसरून 67,750 रुपये प्रति किलो झाले.
जागतिक पातळीवर स्पॉट सोने 0.2 टक्क्यांनी वाढून 1726.84 डॉलर प्रति औंस झाले. तर अमेरिकी सोन्याचे वायदे 0.1 टक्क्यांनी वाढून 1723.80 डॉलरवर पोहोचले आहेत.