वारणा कापशी / वार्ताहर
वारणा कापशी (तालुका शाहुवाडी ) येथे माळवाडी भागांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. येथील अशोक शामराव कदम (गाडीवान) यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर आज पहाटे 4:30 वाजता बिबट्याने हल्ला केला व कुत्र्याला मारलेले आहे . कुत्र्यावर हल्ला करून कुत्र्याच्या पाठीमागील पायाची एक बाजू खाल्लेली आहे. कुत्र्याच्या मानेवर हे बिबट्याची दाताचे व्रण उटलेले दिसून येत आहेत.
वनविभागाचे अधिकारी व वनपाल यांनी प्रत्यक्ष ठिकाणी येऊन पाहणी केली. 48 तासात बिबट्या पुन्हा या परिसरात येऊ शकतो . संध्याकाळी सूर्य मावळल्या नंतर सकाळी उजडेपर्यंत लहान मुले व मोठी माणसे कोणीही घराबाहेर पडू नये. याशिवाय कुत्रे , शेळी, बकरी , लहान जनावरे, यांना बाहेर बांधू नये असे अशा सूचना माळवाडीतील लोकांना वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत.
माळवाडी हा परिसर गावापासुन अतिशय जवळ असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा माग काढून सापळा लावावा. व यग बिबट्याला जेरबंद करावे अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.