प्रतिनिधी/ वाळपई ः
वाळपई नगरपालिकेच्या 10 प्रभागांपैकी शनिवारी नऊ प्रभागांसाठी निवडणूक झाली असून एकूण 85.50 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक 1 मध्ये तर प्रभाग क्रमांक 6मध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे. यावेळी एकूण तेवीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. दरम्यान, सर्वच उमेदवार आपला विजय नक्की असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सर्वच प्रभागात भाजपाचे उमेदवार निवडून येतील, असा दावा केला आहे.
दरम्यान, मतपत्रिकेववर छापलेल्या चिन्हांचा आकार अगदीच छोटा असल्याने वृद्ध मतदारांना याचा बराच त्रास झाला, असा दावा अनेक उमेदवार, मतदारांनी केला आहे. निवडणूक अधिकारी राजेश आजगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक 22 रोजी वाळपई वनप्रशिक्षण सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
वाळपई नगरपालिकेचे एकूण 10 प्रभाग आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक 8मध्ये निर्मला महेश साखळकर या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. यामुळे शनिवारी घेण्यात आलेल्या मतदानात एकूण नऊ प्रभागातून 23 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सकाळी आठ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. बहतांश प्रभागांत चांगले मतदान झाल्यामुळे निकाल अनपेक्षित असण्याची शक्मयता मतदारांनी व्यक्त केलेली आहे.
प्रभागनिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे –
प्रभाग क्र. 1 – 91.78 टक्के, प्रभाग क्र. 2 – 89.90 टक्के, प्रभाग क्र. 3- 81.07 टक्के, प्रभाग क्र. 4 – 89.46 टक्के, प्रभाग क्र. 5- 87.32 टक्के, प्रभाग क्र. 6- 80.0 टक्के, प्रभाग क्र. 7-79. 94 टक्के प्रभाग क्र. 9- 86.69 टक्के, प्रभाग क्रमांक 10- 83.18 टक्के. प्रभाग क्र. 1 मध्ये सर्वाधिक 91.78 टक्के मतदान झाले तर प्रभाग क्रमांक 7 मध्यये 79.94 टक्के मतदान झाले. एकूण 5166 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला यात 2504 पुरुष व 2662 महिला मतदारांचा समावेश आहे.
मतपत्रिका आकारबाबत शंका निरर्थक ः निवडणूक अधिकारी
मतदान केंद्रांवर फेरफटका मारला असता अनेक मतदारांनी मतदानपत्रिकवरील चिन्हांचा आकार लहान असल्याच्या तक्रारी केल्या. याचा ज्ये÷ मतदारांना त्रास झाल्याचे अनेक उमेदवारांनी स्पष्ट केले. मतपत्रिकेवरील चिन्हे लहान असल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे मतदारांनी सांगितले. यामुळे मतमोजणीनंतर मतांची बाद होण्याची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान निवडणूक अधिकारी राजेश आजगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मार्गदर्शक तत्वांनुसार मतपत्रिका होती. त्यामुळे ती छोटय़ा असल्याचा दावा खोडून काढला. ही मतपत्रिका सरकारच्या छापखान्यामधून आली होती, त्या सर्वत्र सारख्याच आकारच्या होत्या. अशी शंका व्यक्त करणे निरर्थक असल्याचे त्यांनी म्हटले.