वार्ताहर/ लोधवडे
वावरहिरे ता.माण येथील खंडोबा माळाच्या डोंगरावर पशु -पक्षी, जनावरांच्या पिण्याचे पाण्याची सोय करण्याच्या हेतूने डोंगराच्या मध्यवर्ती ठिकाणी पाण्याचा जुना झरा शोधून गावच्या युवकांनी जिवंत केल्याने सोय झाली.
संपूर्ण देश लॉकडाऊन असताना अनेकांना प्रश्न पडतो की या काळात काय कामे करायची.अशा परिस्थितीत वावरहिरे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य लखन खुस्पे,जितेंद्र यादव,सचिन यादव,ऋतिक यादव,केशव राऊत,कृष्णांत काशीद यांनी अनोखे माणुसकीचे काम केलेले आहे.हे सर्व जण वावरहिरे येथील खंडोबा माळ परिसरातील डोंगरावर फिरायला गेले असताना त्यांच्या असे लक्षात आले की सध्या सुरू असलेल्या उन्हामुळे या परिसरातील पशु -पक्षी, व अनेक जनावरे यांना पिण्याचे पाणी सोय नाही. त्यांचे अक्षरशः खूप हाल होत होते..अशातच त्यांना तिथे एक जुना झरा दिसला या सर्वांनी त्या झ्रयाला सुरू करण्याचे ठरवले.या सर्वांनी गेले आठवडाभर जसे जमेल तसे काम करून हा झरा सुरू केला. व आज या झ्रयाला नवसंजीवनी मिळाली व या झ्रयात इतक्या उन्हाळ्यातहीजवळपास 200 लिटर पाणी जमा झाले. सर्वांच्या मेहनतीला यश आलेआहे .हा झरा सुरू झाल्याने अनेक पशु पक्षी, प्राणी,वाटसरू यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.या सर्वांनी केलेले कार्य सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील.