रोम
स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाला इटालियन ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला असून इटलीच्या 18 वर्षीय लॉरेन्झो मुसेटीने त्याचा पराभव केला.
तीन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱया 35 वर्षीय वावरिंकाला येथे 10 वे मानांकन मिळाले होते. 249 व्या क्रमांकावर असणाऱया मुसेटीने त्याचा 6-0, 7-6 (7-2) असा धुव्वा उडविला. अन्य सामन्यात रुबलेव्हने अर्जेन्टिनाच्या फॅकुन्डो बॅगनिसचा 6-4, 6-4, मिलोस रेऑनिकने फ्रान्सच्या ऍड्रियन मॅनारिनोचा 7-6 (7-3), 6-2, डेनिस शॅपोव्हॅलोव्हने गुडो पेलाचा 6-2, 6-3, मार्को सेक्चीनाटोने ब्रिटनच्या काईल एडमंडचा 3-6, 7-6 (9-7), 6-2 असा पराभव केला. सेक्चिनाटोची पुढील लढत सर्बियाच्या फिलिप क्रायनोविकशी तर रुबलेव्हची पोलंडच्या हय़ुबर्ट हुरकाझशी होणार आहे.