डॉक्टर मात्र निघाला निगेटिव्ह
प्रतिनिधी / मडगाव
वास्कोतील मांगोरहिल येथील मासे विक्रेत्याची पूर्ण फॅमिली कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना मडगावच्या कोविड हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. या मासे विक्रेत्याचे दोन शेजारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मासे विक्रेत्याला व त्याच्या पत्नीला तसेच त्याच्या दोन्ही मुलांना (एक पोलीस कॉन्स्टेबल) व गर्भवती सुनेलाही मंगळवारी कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
70 पोलिसांची घेतली चाचणी
कोलवा पोलीस स्थानकातील कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर संपूर्ण कोलवा पोलीस स्थानकावरील कर्मचाऱयांना कोरोना चाचणी करून घ्यावी लागली. तसेच या कॉन्स्टेबलचा पोलीस खात्यातील इतरांशी संपर्क आला होता, त्यांनाही चाचणी करून घ्यावी लागली. कालपर्यंत सुमारे 70 जणांची चाचणी करण्यात आली होती. मांगोरहिल येथील हा कॉन्स्टेबल कोलवा पोलीस स्थानकावर डय़ुटीला होता. सद्या त्याला कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याच्या आई-वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे.