प्रतिनिधी / वास्को
वास्को शहर व परीसरात जवळजवळ सर्वच भागात वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. आज संध्याकाळपर्यंत सर्वच भागात वीज पुरवठा सुरळीत होणार असून वीज खात्याचे कर्मचारी बुधवारी रात्रीपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामात व्यस्त होते. मात्र, मुरगाव तालुक्यातील काही भागांमध्ये अद्याप वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही.
वास्को शहर व परीसरात नव्वद टक्क्यांहून अधिक प्रमाणात वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज कर्मचाऱयांना यश आले आहे. उर्वरीत ठिकाणी काही अडचणींमुळे वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. आज दिवसभरात हे काम पूर्ण होऊन वास्कोत वीज पुरवठा शंभर टक्के सुरळीत होईल अशी माहिती वीज खात्याकडून मिळाली. अग्नीशामक दल कोसळलेल्या वृक्षांनी निर्माण केलेले अडथळे दूर करण्याच्या कामात अद्यापही व्यस्त आहेत. मागच्या चार दिवसांत दीडशेहून अधिक ठिकाणी अग्नीशामक दलाला धाव घ्यावी लागली आहे. या घटनांनी निर्माण केलेले अडथळे व धोके दूर करताना दलाच्या कर्मचाऱयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कामात व्यत्यय येत आहे. वादळाने निर्माण केलेले अडथळे दूर करण्यासाठी अद्याप दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुरगाव पालिका क्षेत्रात काही नगरसेवक तसेच समाजसेवक व नेत्यांचे कार्यकर्तेही अडथळे दूर करण्यासाठी धडपड करीत आहेत.
मुरगाव तालुक्यातील काही भाग अद्याप अंधारात
वास्को शहर व परीसरासह दाबोळी व चिखली भागात मंगळवारी मध्यरात्री वीज पुरवठा सुरळीत झाला. सांकवाळ भागात वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, काही भाग अद्यापही अंधारात आहे. बोगमोळतही वीज पुरवठय़ाच्याबाबतीत आता समस्या राहिलेली नाही. मात्र, याच पंचायतीच्या शेजारच्या खोलांत भागात वीज पुरवठय़ाची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. या भागात वादळी वाऱयात मोठमोठे वृक्ष कोसळून निसर्गाची व वीज पुरवठा यंत्रणेची मोठय़ा प्रमाणात हानी झालेली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी वीज खात्याला अद्याप चार दिवस लागण्याची शक्यता आहे. अग्नीशामक दलही कोसळलेले वृक्ष हटवण्यासाठी कष्ट घेत आहेत. पंचायत क्षेत्रामध्ये भारतीय नौदलानेही स्थानिक शासकीय विभागाना अडथळे हटवण्यासाठी मदत केली. नौदलाचे एक पथक मंगळवारी या कामात व्यस्त होते.
वादळी वाऱयाची तालुक्यातील 31 घरांना बसली झळ
दरम्यान, मुरगावच्या मामलेदार कार्यालयाने मुरगाव तालुक्यातील सर्व भागात पाहणी करून घरांच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला आहे. या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार वादळी वाऱयाची झळ 31 घरांना बसलेली असून या घरांचे किरकोळ नुकसान झालेले आहे. शिवाय लोकांची कुंपणे, वाहनांची हानी असेही प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा सुमारे दहा लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मुरगाव तालुक्यात वीज खात्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. मात्र, सध्या वीज खात्याचे कर्मचारी व अधिकारी वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामातच व्यस्त असल्याने त्यांनी नुकसानीचा अभ्यास केलेला नाही.
आमदार एलिना साल्ढाना यांनीही केली वादळाच्या परीणामांची पाहणी
दरम्यान, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांनी वादळाची झळ बसलेल्या इर्सोसी, सांकवाळ व इतर विविध भागांना भेट देऊन तेथील समस्यांची व नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या. तसेच सांकवाळ विभागाच्या वीज खात्याच्या कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन सांकवाळ व इतर ठिकाणचा खंडीत असलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर कार्य करण्याची सुचना केली.