नॉर्थ साऊंड / वृत्तसंस्था
ओशादा फर्नांडोच्या 91 धावांच्या दमदार खेळीनंतर श्रीलंकेने विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱया डावात 5 बाद 323 अशी भक्कम स्थिती प्राप्त केली. लंकेचा संघ या लढतीत चौथ्या दिवसाचा खेळ सुरु असताना 218 धावांनी आघाडीवर होता. फर्नांडो (149 चेंडूत 11 चौकारांसह 91) व लहिरु थिरिमने (201 चेंडूत 4 चौकारांसह 76) यांनी दुसऱया गडय़ासाठी 162 धावांची साकारलेली भागीदारी महत्त्वाची ठरली. या लढतीत श्रीलंकेचा पहिला डाव 169 धावांवर आटोपल्यानंतर विंडीजने सर्वबाद 271 धावांची मजल मारली. मात्र, त्यानंतर लंकेने 5 बाद 323 धावांपर्यंत आगेकूच केली होती. धनंजया डीसिल्वा व पथूम निसांका यांनीही अर्धशतके साजरी केली.