प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहराच्या मूळ हद्दीची विकास योजना दर 20 वर्षानंतर येते. यापूर्वी ही योजना दि. 1 नोव्हेंबर 2001 ला अंमलात आली. तसेच सदर मंजूरी वेळी वगळण्यात आलेली उर्वरित भागश: विकास योजना 18 ऑगस्ट 2005 मंजूर झाली होती. सातारा शहराचा 2023 चा विकास आराखडा तयार करण्याचे काम आठ टप्प्यात करण्यात येणार असून ती सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. त्याकरता जीआय मॅपिंगचे काम सुरुवातीला करण्यात येणार असून, त्याकरता शहरातील नागरिकांच्या हरकती नकाशा पालिकेत ठेवण्यात आलेला असून, त्यावर हरकती व आक्षेप असतील तर ते 60 दिवसात नोंदवावेत, असे आवाहन मुखाधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे. त्यानुसार हे काम करण्यासाठी पुढे एक एजन्सी नेमण्यात येणार असून त्या द्वारे हे काम होणार आहे.
सातारा शहराचा तिसरा विकास आराखडा 2023 चा तयार करण्याच्या अनुषंगाने शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सध्या कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्यात सातारा शहरासाठीच्या मूळ हद्दीची विकास योजना तिसऱ्यांदा सुधारित करणे व हद्दवाढीने नव्याने समाविष्ट क्षेत्रासाठी विकास योजना तयार करण्याच्याची कार्यवाही करण्यात येणार आहेत. त्यामध्येच जीआय मॅपिंगचे काम सुरु करण्यात येणार आहेत. नागरिकांना जे आक्षेप घ्यायचे असतील ते लेखी स्वरुपात पालिकेकडे 60 दिवसाच्या आत नोंदवावेत, असे आवाहन पालिकेच्यवतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, विकास आराखडयाचे काम आठ टप्प्यात होणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रस्तावित अहवाल तयार करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात र्भौगोलिक संदर्भातील नकाशा तयार करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात
भू संदर्भात विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करणे, चौथ्या टप्प्यात प्रस्तावित जमीन वापराचा नकाशा आणि अहवाल तयार करणे, पाचव्या टप्यात मसुदा विकास आराखडा तयार करणे, सहाव्या टप्प्यात प्रकाशने, सुनावणी आणि इतर टप्प्यात मदत प्रशिक्षण व प्रात्याक्षिके होणार आहेत. तर अखेरच्या टप्प्यात आराखडा तयार करण्यात येणार आहे, असे आठ टप्यात हे काम एका एजन्सीच्या माध्यमातून शासन करणार असल्याचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितले.