आयटीच्या समभागांची चमक : निफ्टी 11,440.05 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील शेअर बाजारामध्ये चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी मोठय़ा प्रमाणातील चढ उतारामुळे विक्रीतील दबाव वाढत गेल्याने प्रारंभीची तेजी गमावत सेन्सेक्स, निफ्टी घसरणीसह बंद झाले आहेत.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमुळे सेन्सेक्समध्ये 98 टक्क्मयांची घसरण दिसून आली. तसेच एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेलचे प्रमुख समभाग विक्रीमुळे घसरणीसह बंद झाले आहेत. व्यवसायाच्या दरम्यान सेन्सेक्सने 657 अंकांनी तेजी प्राप्त केली होती परंतु मोठय़ा विक्रीमुळे ही तेजी बाजाराने नंतर गमावली.
दिवसअखेर सेन्सेक्स 97.92 अंकांनी घटून 38,756.63 वर बंद झाला आहे. तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 24.40 अंकांनी घसरुन 11,440.05 वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये भारती एअरटेलचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्मयांनी घसरले आहेत. बजाज फायनान्स, पॉवग्रिड, स्टेट बँक, एचडीएफसी बँक आणि सन फार्माचे समभाग घसरले आहेत. यासह एचसीएल टेकचे समभाग सर्वाधिक 10 टक्क्मयांच्या वाढीसोबत बंद झाले आहेत.
एचसीएल टेकने सप्टेंबर तिमाहीसाठी परिचलन मार्जिन आणि उत्पन्नामुळे मागील अनुमान प्रमुख पातळीसोबत चांगली कामगिरी करण्याचे संकेत आहेत. टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि टायटनचे समभाग पाच टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. आशियाई बाजारात शांघाय, हाँगकाँग, सोल आणि टोकीओतील बाजार वाढीसोबत बंद झाले आहेत. जागतिक कच्च्या तेलाचा बेंचमार्क ब्रेंट क्रूड तेल 0.85 टक्क्मयांनी घटून 39.49 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.