क्रीडा प्रतिनिधी :
गडहिंग्लज येथील उद्योगपती आर. जे. पाटील पुरस्कृत गडहिंग्लज क्रिकेट अकादमी आयोजित आर. जे. पाटील चषक आंतर क्लब साखळी स्पर्धेत अपराजित असलेल्या बेळगावच्या विजया क्रिकेट अकादमी संघाने चारही सामने जिंकुन 17 वर्षाखालील मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकाविले.
या स्पर्धेतील विजया क्रिकेट अकादमीचे सामनावीर पुरस्कार यश हाळवाण्णाचे तर मालिकावीर पुरस्कार मनोज सुतार यांना देण्यात आला. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षिस वितरण समारंभात स्पर्धा पुरस्कर्ते आर. जे. पाटील, ऍड. दिग्वीजय कुराडे, मिलींद कोरी यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघाना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
विजया क्रिकेट अकादमी : 25 षटकात 6 बाद 216 (मनोज सुतार 9 चौकार 61, यश हाळवाण्णाचे 7 चौकार 1 षटकार नाबाद 60, ओमकार माटले 3 चौकार 32, रोशन बेकवाडकर 18, शिवम गावडा 16 धावा, निपाणी क्रिकेट अकादमीतर्फे श्रेयस 2, अदित्य 2 बळी)
निपाणी क्रिकेट अकादमी : 25 षटकात 5 बाद 80 धावा (विरेश 48 धावा, विजया अकादमीतर्फे सुजल कळसण्णावर, यश हाळवाण्णाचे, दुर्वांकर हुंबरवाडी, आशिष देसाई, शिवम गावडा प्रत्येकी एक बळी)