तरुण भारत संवाद सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील विडी कारखानादारांनी विडी कारखाने तत्काळ सुरू करा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी सांगितले.
शहरातील विडी कारखानादार हे आपल्या स्वार्थासाठी व आपले नुसकान होईल, यामुळे विडी कारखाना सुरू करत नाहीत. परंतू उद्यापासून संबंधित विडी कारखाना सुरू करावे. अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत आयुक्त शिवशंकर म्हणाले, कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रणाबाबत महापालिका क्षेत्रातील विडी उद्योगसंदर्भात आदेश व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
p