प्रतिनिधी /पणजी
नव्या तांत्रिक युगात विणकाम सारख्या कलेच्या गुणावत्तेत वाढ करताना नविन संकल्पना आत्मसात करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन गोवा हस्तकला व हॅण्डलूम सहकारी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विजयादेवी राणे यांनी केले.
अल्पसंख्यांक मंत्रालय, भारत सरकारच्या योजने अंतर्गत नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ डिझाईन यांनी औद्योगिक हस्तकला व हॅण्डलूम सहकारी संस्था गोवा यांच्या सहकर्याने आयोजित केलेल्या दोन आठवडयाच्या विणकाम (क्रोशे क्राफट ऑफ गोवा) कार्यशाळेचे उद् घाटन केल्यानंतर बोलत होत्या यावेळी व्यासपिठावर नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ डिझाईनचे समन्वयक राजन ख्रिस्तोफर ,मार्गदर्शक वरूण सहानी, सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष दिपक नार्वेकर, सचिव शशिकांत पुनाजी, व खजिनदार सुरेश सावंत उपस्थित होते
प्रा. वरूण सहानी यांनी यावेळी बोलताना गोवा राज्यात पोर्तुगिज काळापासून विकससित असलेली विणकाम कलेचा दर्जा उंचावण्यासाठी ही कार्यशाळा उपयोगी होणार असल्याचे सांगीतले. या कार्यशाळेत गोव्यातील निवडक 25 महीला हस्तकारागीरांचा सामावेश असून 19 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत ही कार्यशाळा पाटो पणजी येथे घेतली जात आहे. पुढील कार्यशाळा अहमदाबाद गुजरात येथे होणार आहे.डिझायनर प्रज्ञा शर्मा, रेषमा टिलर, अपुर्वा कुशावहा या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करीत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष दिपक नार्वेकर यांनी स्वागत केले तर कार्यशाळेच्या संयोजक उत्कर्षा बाणस्तरकर यांनी आभार मानले.