टी-20 विश्वचषक : यापूर्वीच बाहेर फेकल्या गेलेल्या लंकेचा 20 धावांनी विजय, निसांका-असलंकाची फटकेबाजी
वृत्तसंस्था /अबु धाबी
विद्यमान विजेत्या विंडीज संघाचे आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आव्हान गुरुवारी संपुष्टात आले. सुपर-12 फेरीतील लढतीत श्रीलंकेकडून 20 धावांनी पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर विंडीज संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. लंकेने 20 षटकात 3 बाद 189 धावांचा डेंगर रचला तर प्रत्युत्तरात विंडीजला 20 षटकात 8 बाद 169 धावांवर समाधान मानावे लागले.
लंकेने डावखुरा युवा फलंदाज चरिथ असलंकाने 41 चेंडूत 68 धावा झोडपल्या. शिवाय, पथूम निसांका (41 चेंडूत 51) यांनी 10.1 षटकात 91 धावांची भागीदारी साकारली. विजयासाठी 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजतर्फे शिमरॉन हेतमेयरने 54 चेंडूतच 81 धावांची आतषबाजी केली. पण, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. लंकेतर्फे वणिंदू हसरंगाने 4 षटकात 19 धावात 2 बळी घेतले.
तत्पूर्वी, लंकन फलंदाजांनी तुफानी हल्ला चढवत विंडीजला 190 धावांचे कठीण आव्हान दिले. अबु धाबीतील खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम ठरत चालली असून याचा लंकन फलंदाजांचा पुरेपूर लाभ घेतला होता.
धावफलक
श्रीलंका : पथूम निसांका झे. हेतमेयर, गो. ब्रेव्हो 51 (41 चेंडूत 5 चौकार), कुसल परेरा झे. व गो. रसेल 29 (21 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), चरिथ असलंका झे. हेतमेयर, गो. रसेल 68 (41 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), दसून शनाका नाबाद 25 (14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), चमिका करुणारत्ने नाबाद 3. अवांतर 13. एकूण 20 षटकात 3 बाद 189.
गडी बाद होण्याचा क्रम
1-42 (कुसल, 5.2), 2-133 (निसांका, 15.3), 3-179 (असलंका, 18.4).
गोलंदाजी
चेस 1-0-6-0, होल्डर 4-0-37-0, रवी रामपॉल 4-0-37-0, आंद्रे रसेल 4-0-33-2, अकिल होसेन 2-0-22-0, डेव्हॉन ब्रेव्हो 4-0-42-1, केरॉन पोलार्ड 1-0-8-0.
विंडीज : ख्रिस गेल झे. डीसिल्व्हा, गो. फर्नांडो 1 (5 चेंडू), इव्हिन लुईस त्रि. गो. फर्नांडो 8 (6 चेंडूत 2 चौकार), निकोलस पूरन झे. बदली खेळाडू (धनंजया), गो. चमीरा 46 (34 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), रोस्टन चेस झे. राजपक्ष, गो. करुणारत्ने 9 (8 चेंडूत 2 चौकार), शिमरॉन हेतमेयर नाबाद 81 (54 चेंडूत 8 चौकार, 4 षटकार), आंद्रे रसेल झे. व गो. करुणारत्ने 2 (4 चेंडू), केरॉन पोलार्ड त्रि. गो. डीसिल्व्हा 0 (1 चेंडू), जेसॉन होल्डर झे. करुणारत्ने, गो. शनाका 8 (5 चेंडूत 1 षटकार), डेव्हॉन ब्रेव्हो त्रि. गो. डीसिल्व्हा 2 (3 चेंडू), अकिल होसेन नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 11. एकूण 20 षटकात 8 बाद 169.
गडी बाद होण्याचा क्रम
1-1 (ख्रिस गेल, 1.2), 2-10 (लुईस, 1.6), 3-47 (चेस, 5.3), 4-77 (पूरन, 11.1), 5-94 (रसेल, 13.1), 6-107 (पोलार्ड, 14.1), 7-117 (होल्डर, 15.2), 8-131 (ब्रेव्हो, 16.6).
गोलंदाजी
महिश तिक्षणा 4-0-21-0, बिनुरा फर्नांडो 2-0-24-2, दुष्मंता चमीरा 4-0-41-1, चमिका करुणारत्ने 4-0-43-2, दसून शनाका 2-0-18-1, वणिंदू हसरंगा 4-0-19-2.